breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

National Cinema Day : आज फक्त ९९ रूपयात पाहता येणार कोणताही सिनेमा

National Cinema Day : तुम्ही जर सिनेमाप्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आज १३ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त प्रेक्षकांना फक्त ९९ रूपयात सिनेमागृहात चित्रपट पाहता येणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढल्यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. करोना काळात ही स्पर्धा वाढली. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ओटीटीकडे वळले, त्यामुळे सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या लक्षणीयरित्या घटली. सिनेमागृहे पुन्हा प्रेक्षकांनी गजबजावी, या उद्देशाने हा दिवस साजार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – भुईंज पोलीसांच्याकडून २२ लाख रूपयांची चोरी उघड, आरोपी जेरबंद 

यंदा ‘जवान’, ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना प्रमोट करण्याचा सिनेमा हॉल मालकांचा प्रयत्न आहे. या वर्षी राष्ट्रीय सिनेमा दिन ४ हजारपेक्षा जास्त स्क्रीनवर साजरा केला जाईल. यात PVR, Inox, Cinepolis, Mirage, Citypride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि Delight यासह अनेक मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहा समावेश आहे. या सर्व चित्रपटगृहात जाऊन तुम्ही ९९ रुपयांत चित्रपट पाहू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button