breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri | वाकडमधील ‘ती’ इमारत अखेर जमीनदोस्त, बिल्डरवर दाखल होणार गुन्हा

पिंपरी | तीन मजली बांधकाम सुरू असताना वाकड भागातील झुकलेली इमारत बुधवारी पाडण्यात आली. याबाबत महापालिकेकडून बिल्डरला नोटीस बजावण्यात येणार असून, गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. मात्र, या बांधकामाला महापालिकेने परवानगी दिली असल्याचे आणि परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम केल्याचेही आता उघड झाले आहे.

वाकड पोलीस ठाणे ते थेरगाव या रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम पूर्ण होत आले आहे. काही लोक येथे राहायला देखील येणार होते. मात्र, मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीच्या बांधकाम एका बाजूला झुकले. त्यामुळे इमारत वाकली गेली. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा     –      ‘काका का? कारण पुतण्या गद्दार निघाला’; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर खोचक टीका 

या इमारतीच्या शेजारी राहणारे राहुल सरोदे यांनी ही बाब लक्षात येताच महापालिकेच्या थेरगाव उप अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पिंपरी आणि थेरगाव येथील अग्निशमन दलाचे बचाव पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. दरम्यान पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते. वाकलेली इमारत पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. इमारत पडणार अशी भीती सर्वजण व्यक्त करत होते.

अवघ्या काही वेळात ही माहिती सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली. महापालिका बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्याने अशी परिस्थिती उदभवल्याचे दिसून आले आहे. तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे बांधकाम जमीनदोस्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button