breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘भाजपचा राजीनामा द्यावा, आम्ही त्यांना मविआतून निवडून आणू’; नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची ऑफर

धाराशिव | काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते. पण नितीन गडकरी यांचे नाव नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच झुकले नव्हते. आताचा महाराष्ट्र तरी कसा झुकेल? काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजप वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची.

हेही वाचा     –    महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात 

इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला कंटाळून त्यावेळी मतदारांनी नवा पर्याय निवडला. आताही त्याच घटनेची पुनरावृत्ती होणार आहे. आमदार, खासदारांना तुम्ही विकत घेतले असेल. मात्र महाराष्ट्रातील जनता ही विकावू नाही. ही जनता तुम्हाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जगदंबेची शपथ घेवून सांगतो, अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्याचे कबुल केले होते. आता ते खोटे बोलत आहेत. तुळजाभवानी देवीच्या साक्षीने या खोटारड्या सत्ताधार्‍यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची शिक्षा म्हणून मुख्यमंत्री पदावरून आपल्याला हटवले का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button