breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रपतीपदासाठी बौद्धिक क्षमता व उंची लागते; गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर पुन्हा टीका

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘शरद पवार हे वयाने वृद्ध आहेत, मात्र राष्ट्रपतीपदासाठी उंची लागते,’ असा टोला सदावर्ते यांनी लगावला आहे.

राष्ट्रपतीपदाबाबत बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी आधीच्या राष्ट्रपतींचाही दाखला दिला. ‘चर्चेसाठी शरद पवार यांचं नाव ठीक आहे, पण राष्ट्रपती होण्यासाठी बौद्धिक क्षमता लागते. या पदावर यापूर्वी कोण-कोण होते ते बघा. याआधीच्या राष्ट्रपतींनी आपआपल्या क्षेत्रात उंची गाठली होती. त्यामुळे पवारांना हे सांगावं लागेल की ते नक्की कशात परिपूर्ण आहेत,’ असं सदावर्तेंनी म्हटलं आहे.

‘मला त्रास देण्यामागे पवारांचा हात’

एसटी कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर पैसे वसुली प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी गुरुवारी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री यांची गुरुवारी साडेतीन तास चौकशी केली. अकोट पोलिसांनी ११ एप्रिलला सदावर्ते दाम्पत्यासह अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडे अशा चौघांवर गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मला त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामागे शरद पवार यांचा हात आहे, मात्र माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

न्यायालयीन प्रक्रियेच्या खर्चापोटी सुमारे ७४ हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३००-४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते आणि इतर तीन जणांवर आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी यासंदर्भात तक्रार दिली. या आधारावर अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २१ एप्रिलला अकोट न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला. गुरुवारी सदावर्ते दाम्पत्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले. या दोघांची अकोटचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या कक्षात चौकशी करण्यात आली. भविष्यात चौकशीसाठी आणखी हजर राहावे लागेल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button