breaking-newsराष्ट्रिय

मध्यप्रदेश, राजस्थान मध्ये कॉंग्रेसशी आघाडी नाही: मायावती

नवी दिल्ली– मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत आपला पक्ष कॉंग्रेसशी आघाडी करणार नाही अशी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे विरोधी पक्षांच्या आघाडीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानात आपला पक्ष स्वबळावर किंवा अन्य प्रादेशिक पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवेल असेही त्यांनी घोषित केले आहे.
बहुजन समाज पक्ष संपवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने चालवला आहे असा आरोप करून त्या म्हणाल्या की त्यांना भाजपला सत्तेवरून घालवण्यापेक्षा बहुजन समाज पक्षाला खच्ची करण्यात फार स्वारस्य आहे. त्यामुळे आम्ही कर्नाटकात प्रादेशिक पक्षाशी आघाडी केली. छत्तीसगडमध्येही आम्ही तोच प्रयोग केला. आता मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्येही आम्ही तोच प्रयोग करू असे त्या म्हणाल्या. मायावती यांनी छत्तीसगड मध्ये अजित जोगी यांच्या पक्षाशी आघाडी केली आहे. त्यामुळे डिसेंबर मध्ये ज्या तीन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत तेथे मायावतींनाही आपल्या समवेत घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न विफल झाला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button