breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मित्रांनी केला मित्राचा डोक्‍यात दगड घालून खून

सिंहगड पोलिसांनी बारा तासाच्या आत आरोपींना केले जेरबंद
पुणे- जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्राला दारु पाजून खडकवासला धरण परिसरात डोक्‍यात दगड घालून खून केला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तीघांना अटक केली आहे.
गणेश कवळे (20, रा.शिवणे), भुषण गायकवाड(23, रा.वारजे), मंदार शिंदे(27,रा.वारजे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी तर योगेश ढोणे(25, रा.शिवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत योगेश व तीघेही आरोपी मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. याचा राग मनात धरुन गणेश , भुषण व मंदार यांनी योगेशचा काटा काढायचा प्लॅन केला. त्यानूसार रविवारी योगेश यास शिवणे येथून गाडीवर बसवून खडकवासला परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला भरपूर दारु पाजण्यात आली. यानंतर पानशेत धरण परिसरात नेऊन त्याच्या डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. योगेश रात्रभर घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी तो पालखीस गेला असावा असे समजून त्याचा शोध घेतला नाही. तसेच पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली नाही. मात्र सिंहगड पोलीस ठाण्यातील संतोष सावंत यांना योगेशचा खून आरोपींनी केला असल्याची खबर मिळाली. त्यानूसार तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीशी खाक्‍या दाखवल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी पानशेत धरण क्षेत्रात पाच ते सात किलोमीटर परिसरात शोध घेऊन योगेश ढोणे याचा मृतदेह हस्तगत केला. मृतदेह मिळाल्यावर सिंहगड पोलिसांनी याची माहिती वेल्हा पोलिसांनी दिली. तेथील सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलावळ यांनी मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच सिंहगड पोलिसांकडून आरोपींना ताब्यात घेतले.
कोणतीही तक्रार दाखल नसताना सिंहगड पोलिसांनी मिळालेल्या खबरीवरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस नाईक संतोष सावंत, देशमुख, कायगुडे, जगदाडे, शिनगारे, किशोर शिंदे, मयुरी शिंदे, निलेश कुलथे यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button