breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दाऊदची बहिण हसीना पारकरच्या घराचा लिलाव

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घराचा लिलाव आज करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाडयातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घराचा आज लिलाव केला. गार्डन हॉलमधील फ्लॅट 1 कोटी 80 लाखांना विकण्यात आला आहे.

2014 रोजी हसीनाच्या मृत्यूआधी हसीना याच फ्लॅटमध्ये राहत होती तसेच देश सोडून फरार होण्याआधी कुख्यात गुंड दाऊद हा देखील याच फ्लॅटमध्ये राहत होता. 2014 रोजी हसीना पारकरच्या मृत्यूनंतर धाकटा भाऊ इक्‍बाल कासकर तेथे रहायचा. 2017 मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकरला तेथूनच बेडया ठोकल्या होत्या.

सीबीआयने 1997 साली दाऊदच्या या घरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. सफेमा यांनी दाऊदच्या गार्डन हॉल अपार्टमेंटमधील फ्लॅटवर टाच आणल्यानंतर त्याच्या लिलावासाठी 28 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तसेच लिलावासाठी 1 कोटी 69 लाख किंमत ठरविण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button