TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनः १६ ज्ञात तर ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल; संपूर्ण राज्यभरातून व्यक्त होतेय संताप अन् निषेध

शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा आमानुष लाठीमार

पिंपरीः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. तर मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संपूर्ण राज्यभरातून, सर्वच स्तरातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जालन्यात जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी एकूण १६ ज्ञात तर ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालन्यातील गोंदी येथील पोलीस स्थानकात त्यांच्यावर कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेलचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , काल रात्री घडलेल्या घटनेनंतर पोलींसानी आरोपींचा शोध सुरू केला. काल मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर शेजारच्या गावांमध्ये आरोंपीचा शोध पोलीसांनी सुरू केला आहे. त्यामध्ये १६ आरोपींची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कलम ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७ यासह सार्वजनिक मालमत्तेचे, खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणात त्याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आंदोलनस्थळी काल जी दगडफेक झाली त्या अनुषंगाने पोलीसांनी शोध सुरू केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

घटनेत काही पोलीसही जखमी
तर यामध्ये गंभीर बाब म्हणजे पोलीसांना कट करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा जवळपास ३०७ आणि ३३३ कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ३०० ते ३५० लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेत काही पोलीसही जखमी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button