breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी रद्द करा – यश दत्ताकाका साने

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतील बोऱ्हाडेवाडी, रावेत व चऱ्होली या 3 गृहप्रकल्पांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. यावेळी केंद्र चालक नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून त्यांची लूट करत असल्याचा आरोप स्वर्गीय दत्ताकाका साने स्पोर्टस फाऊंडेशनचे यश साने यांनी केला आहे. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे.

पालिकेने सन 2017 मध्ये या योजनेसाठी अर्ज मागविले होते. त्यावेळी तब्बल दीड लाखापेक्षा अधिक अर्ज पालिकेस प्राप्त झाले होते. त्या अर्जावर पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. असे असताना आता केवळ 3 प्रकल्पासाठी 5 हजारांच्या डीडीसह पुन्हा नव्याने अर्ज घेण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये शुल्क आकारावे असे पालिकेने जाहीर केले आहे. मात्र अनेक नागरी सुविधा केंद्रात अधिक शुल्क घेऊन नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. तसेच अनावश्‍यक कागदपत्रांची सक्ती केली जात आहे.

तसेच सर्वेक्षणात सहभाग न घेतलेल्या नागरिकांनाही एसएमएस पाठवून अर्ज भरण्याबाबत सांगितले जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषी केंद्रचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी यश साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button