breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

वरुण धवन अलिबागला पोहोचला, लग्नाची लगबग सुरू

अलिबाग – सध्या बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. वरुण आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल दोघेही अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. उद्या २४ जानेवारी २०२१ रोजी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन प्रेयसी नताशा दलालबरोबर विवाह बंधनात अडकणार आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या ‘द मॅन्शन हाऊस’ या रिसॉर्टवर त्यांचे लग्न होणार आहे.

वाचा :-जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगना चौकशीसाठी गैरहजर

वरुण-नताशाच्या लग्नाचे नियोजन करणारी टीम आधीच रिसॉर्टमध्ये पोहोचली आहे. तीन दिवस हा लग्न सोहळा चालणार आहे. विवाह स्थळी आलेल्या धवन कुटुंबाच्या स्टाफला तसेच विवाह स्थळी काम करणाऱ्या लोकांना मोबाइल फोनचा वापर टाळायला सांगितला आहे. कोरोना काळ असल्याने या विवाहासाठी फार कमी पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

बॉलिवूडमधील वरुण आणि डेव्हिड धवन यांच्या जवळच्या मित्रपरिवाला निमंत्रण देण्यात आले आहे. डेव्हिड धवन यांच्यासोबत अनेक चित्रपट करणारा बॉलिवूडचा दबंग सलमान खानला या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. सलमानची पूर्व प्रेयसी आणि वरुणची मैत्रीण कॅटरिना कैफलाही या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button