breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पर्यटकांनो… शिवनेरी, लेण्याद्री – ओझर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार

पुणे |महाईन्यूज|

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेला किल्ले शिवनेरी आणि लेण्याद्री पर्यटकांसाठी ३१ मार्चपर्यत दर्शनासाठी बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह राठोड यांनी दिला आहे.या आदेशानुसार केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कक्षेत असलेली देशातील सर्व राष्ट्रीय स्मारक स्थळे १७ ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने किल्ले शिवनेरी आणि लेण्याद्री दर्शनासाठी बंद करण्यात आले.

लेण्याद्री गणपती देवस्थानच्या वतीने या कालावधीत दैनंदिन पूजा अर्चा करण्यात येणार असून भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन केले आहे. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत श्री विघ्नहराचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचे ठरविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे सुचनेनुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव ‘श्रीं’चे मंदिर देवदर्शनासाठी बंद करण्यात आले आहे .सर्व भाविकांनी यांची नोंद घ्यावी अशी विनंती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button