breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

आप्पासाहेबांच्या नावाने पत्र व्हायरल करणाऱ्याला पुण्यातून अटक

पुणे : राज्य सरकारच्या वतीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खारघर येथे देण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात उष्माघाताने १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांलर प्रसारित झालं होतं. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. त्याची दखल रायगड पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल करत पत्र व्हायरल करणाऱ्या एका २४ वर्षीय व्यक्तीला पुण्यातून अटक केली आहे.

शुभम काळे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित आरोपी असलेल्या शुभम काळे याला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये रायगड पोलिसांनी त्याला आज अलिबाग न्यायालयात हजर केले होते. त्यानुसार त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button