breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवमध्ये मंदिराचा स्लॅब कोसळला; एका महिलेसह तिघांचा मृत्यू

  • सात जण गंभीर जखमी, वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे गुरव येथील स्माशान भुमीजवळील पवना नदीच्या शेजारी असलेल्या शंकराच्या मंदिराचे दगडी बांधकाम सुरु आहे. आज (बुधवार) सायंकाळी पावणेचारच्या सुमारास सभा मंडपाचे काम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळला, त्या खाली अडकून एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. तर सात कामगार गंभीर जखमी झाले.

सुत्रांच्या माहितीनुसार, चिदम्मा पुजारी (वय ३०), संतोष संजीत दास ( वय ३०) आणि प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहे. पिंपळे-गुरव भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम सुरु आहे. बुधवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मंदिराचा सभा मंडप दगडी खांबासह खाली कोसळला. यावेळी या तिघांसह एक जण तिथे काम करीत होते. हे काम सुरु असतानाच सभा मंडपाचा स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला. पारंपारिक पद्धतीने या मंदिराचे बांधकाम सुरु होते, त्यासाठी एकावर एक खांबाचा भाग रचून वर चढवला जात होता.

या घटनेचे वृत्त समजताच स्थानिक नगरसेवक, नागरिकांनी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  जखमींना  मलखांब्याखालून बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर घटना स्थळी सध्या जेसीबीच्या सहायाने मलबा काढण्याचे काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button