आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तुमच्याकडे ‘ई-कचरा’ जमा झालाय का? आम्ही तो घेऊ, शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाटही करु

पिंपरी चिंचवड | डिजिटल क्रांती सोबत भरमसाठ उपकरणं निर्माण झाली त्यांचा वापर वापर वाढला. याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या हातातील मोबाईल, पूर्वी साधे फोन होते आता स्मार्ट फोन आले. घरातील प्रत्येकाकडे आज स्मार्टफोन आहेत, टॅबलेट, लॅपटॉप, घरातील टिव्ही देखील आज स्मार्ट झाला आहे. या वस्तूंसोबत प्रत्येकाच्या घरात ‘ई-कचरा’ देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याला विल्हेवाट करण्याची शास्त्रीय पद्धत माहित नसल्याने दिवसेंदिवस तो वाढतच जात आहे. यासाठी आता काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम ( PCCF), कै‌. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन पोलिस व नागरिक मित्र संघटना (KTTF) आणि जनवानी या स्वयंसेवी संस्थांनी ई-कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ई-कचरा स्वीकारणारी केंद्र उभारली जाणार आहेत. याठिकाणी तुम्ही घरातील अनावश्यक ई-कचरा आणून देऊ शकता.

गोळा झालेल्या ई-कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट केली जाणार आहे तसेच, त्यातील उपयोगात येणाऱ्या वस्तू गरजूंना दान केली जातील. ज्या वस्तूंचा किरकोळ दुरुस्ती करुन वापर केला जाऊ शकतो अशा वस्तू गरजवंताना दान केल्या जाणार असल्याचे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

कोणकोणत्या वस्तू देऊ शकता ?
जुने, निरोपयोगी मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, प्रिंटर, माऊस, मोबाईल, लॅपटॉपच्या बॅटरीज्, लॅन्ड लाईन फोन, रेडिओ, टिव्ही, कॅल्क्युलेटर, जुना कॅमेरा, वायर्स, पिन, केबल्स, पेनड्राईव, आयपॉड, वॉकमन, हेडफोन्स, सेल यासारख्या वस्तू तुम्ही केंद्रावर जमा करु शकता.या वस्तू महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मान्यता प्राप्त संस्थेला देण्यात येतात, ती संस्था शास्त्रीय पद्धतीने या वस्तूंची विल्हेवाट लावते.

ई – कचरा संकलन रविवार (दि. 29 ऑगस्ट) सकाळी 9.30 ते दुपारी 1 पर्यंत. अ प्रभाग कार्यालया बाहेर, भेळ चौक, निगडी प्राधिकरण

अधिक माहिती व ई-कचरा देण्यासाठी संपर्क –
ऋषिकेश तपशाळकर – 9011050005
अशोक तनपुरे – 99224 61173

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button