breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘झुंड’चे ओटीटी हक्क इतक्या कोटींना विकले; बिग बींच्या चित्रपटाची प्रतीक्षा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे  यांच्या ‘झुंड’  चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. चित्रपटगृहांमध्ये ‘झुंड’ प्रदर्शित केला जाणार की नाही याबाबतची ठोस माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र या बहुचर्चित चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकले गेल्याचं कळतंय. जवळपास ३३ कोटींना या चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकले गेल्याचं समजतंय. लॉकडाउनच्या अटींमुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह बंद आहेत आणि इतर राज्यांमध्ये मर्यादित क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत.

‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांचा हा बायोपिक आहे. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचीही भूमिका असल्याचं कळतंय.

आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या नागराज यांच्या झुंड या चित्रपटाचे सर्वांना वेध लागले आहेत. कोरोनाच्या अगोदर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. झुंडमध्ये महानायक अमिताभ काम करणार असल्यानं चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button