breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

Ram Mandir | जाणून घेऊयात देशातील सर्वात मोठी ५ राम मंदिरं!

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं असून प्रभू श्रीराम आज विराजमान झाले आहेत. देशातील रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. दरम्यान, आज देशातील काही इतर मोठ्या आणि प्रसिद्ध ५ राम मंदिराबद्दल जाणून घेऊया..

रामराजा मंदिर, मध्य प्रदेश : मध्यप्रदेशातील ओरछा येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही रामाची मोठी भक्त होती असे म्हणतात. तिने त्याला अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते. प्रभू रामाची मध्य प्रदेशात राजा म्हणून पूजा केली जाते.

काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र : महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील काळाराम मंदिरात प्रभू राम वनवासात राहिले होते. हे १७८२ मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले होते. या मंदिरात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणापासून बनवलेल्या मूर्ती आहेत आणि त्यांची उंची सुमारे २ फूट आहे.

हेही वाचा     –    ‘मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येत जाणार’; मनोज जरांगे पाटील 

रामास्वामी मंदिर, तामिळनाडू : हे मंदिर ४०० वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी कुंभकोणम, तामिळनाडू येथे बांधले होते. या मंदिरात गर्भगृहात भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती विवाहाच्या मुद्रेत एकत्र बसलेल्या दिसतात.

सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा : भारतात हे राम मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ते तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये आहे. रामनवमीच्या दिवशी तिथे मोठी गर्दी जमते. राम नवमीला भगवान राम आणि सीता यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे मंदिर भद्राचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ : हे मंदिर भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जातात. भगवान श्रीकृष्ण या मंदिरात रामाच्या मूर्तीची पूजा करत असत. भगवान श्रीकृष्ण हे जग सोडून गेले तेव्हा मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. नंतर ही मूर्ती काही मच्छिमारांना सापडली आणि त्यांनी ती केरळच्या चेट्टुवा भागात स्थापित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button