breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,12,44,786 वर

  • 24 तासांत 15,388 नवे रुग्ण

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थितीबाबत चिंता वाढत असतानाच आता देशभरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत 15,388 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 77 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,12,44,786 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,57,930 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 16,596 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,08,99,394 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,87,462 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button