ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण आणि कारची तोडफोड; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड | पतीसोबत कार मधून जात असलेल्या महिलेचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी विनयभंग केला. महिलेच्या पतीला मारहाण केली तसेच कारचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडली.याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आणि त्यांचे पती कार मधून जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. त्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. फिर्यादी यांच्या पतीला मारहाण करून शिवीगाळ केली. पतीला धमकी देऊन कारचे खोडसाळपणे नुकसान केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button