breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; सहा विद्यार्थी अव्वल

नवी दिल्ली – आयआयटीसह इतर इंजिनीअरिंग संस्थांमधील प्रवेशासाठी देशपातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत महाराष्ट्रातील सिद्धांत मुखर्जी याच्यासह देशातील सहा विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळवले आहेत. यामध्ये राजस्थानचा साकेत झा, दिल्लीतील प्रवर कटारिया, रंजिम प्रबल दास, गुजरातमधील आदिनाथ किदांबी आणि चंदिगड येथील गुरमित सिंग या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर मुलींमध्ये तेलंगणाची कोम्मा शरण्या (९९.९९ पर्सेंटाईल) अव्वल ठरली आहे.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,12,44,786 वर

करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना संधी गमवावी लागू नये यासाठी यंदा चारवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातील पहिली परीक्षा राष्ट्रीय परीक्षा कक्षाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान घेतली. या परीक्षेचा निकाल अवघ्या दहा दिवसांत जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा देशभरातील ३३१ केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यापैकी नऊ केंद्र परदेशातील होती. तसेच या परीक्षेसाठी ६ लाख ५२ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १ लाख ९७ हजार ७७१ मुली, ४ लाख ५४ हजार ८५२ मुले आणि ४ तृतीय पंथीयांचा समावेश होता. त्यापैकी ६ लाख २९ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

दरम्यान, गेल्या वर्षापर्यंत ही परीक्षा ३ भाषांमध्ये घेण्यात येत होती. तर यंदा इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीसह पहिल्यांदाच आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यात परीक्षार्थींचे सर्वाधिक प्राधान्य इंग्रजी आणि त्यानंतर हिंदीला होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button