TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकालात काढणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर सरसकट माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल. त्याचसोबत ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपा- शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अनधिकृत ठरवण्यात आलेली बांधकामे नियमित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांना यापुढे मोर्चे काढावे लागणार नाहीत. ठाणे महापालिका हद्दीतील बांधकामे ज्यापद्धतीने नियमित केली. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील बांधकामे नियमित करण्यात येतील. प्राधिकरण हद्दीतील साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न, नदी सुधार प्रकल्प, पिंपरी ते निगडी मेट्रोही लवकरच सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. पुणे रिंग रोडचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यात सर्वत्र बाळासाहेब ठाकरे दवाखाना…
मुंबईमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून ठिकठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्यात आले. त्याच धर्तीवर राज्यात सर्वत्र असे आरोग्य सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना सूचना केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेबांचे विचार घेवून आम्ही सरकार आम्ही स्थापन केले. आजची निवडणूक खऱ्या अर्थाने भाजपा-शिवसेना महायुतीची निवडणूक आहे. त्यामुळे आम्हाला चिंता वाटत नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button