breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्र

खळबळजनक ः नाशिकमधील DRDOच्या परिसरात ड्रोन उडविला.., महिन्यातील दुसरी घटना

Sensational: Drone flown in DRDO area in Nashik.., second incident in a month

नाशिक । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

लष्कराच्या परिसरात अज्ञात ड्रोन उडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नववा मैल परिसरात संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच (डीआरडीओ) यांचे कार्यालय आहे. तिथे चौकी क्रमांक दोनजवळ संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात ड्रोन उडताना दिसला. काही क्षणात हा ड्रोन तिथून निघून गेला. या प्रकारणी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीआरडीओ कार्यालय क्षेत्रापासून काही किमी अंतरावर एचएएल आणि ओझर विमानतळाचे क्षेत्र आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस व एटीबीला पोलीस आयुक्तालयाने तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, महिन्याभरपूर्वीच गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल परिसरात रात्री दहा वाजेच्या सुमारास ड्रोन उडविला गेला होता. स्कुलच्या ‘ट्राफिक कंट्रोल’ रुममध्ये हा प्रकार लक्षात आला होता. या प्रकरणी उपनगर पोलिसांत अज्ञताविरुद्ध सैनिकी क्षेत्रात ड्रोन उडवल्याचा गुन्हा दाखल आहे. पण, ड्रोन चालक पोलिसांना अद्याप सापडलेला नाही.

सप्तश्रृंगी गडाच्या मार्गावर खड्डेच खड्डे; गणेश टप्पा ठरतोय धोकादायक
विमान अधिनियम १९३४ चे कलम ११ नुसार आणि कोणतेही परवानगी न घेता लष्करी भागात ड्रोन उडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. लष्करी हद्दीत ड्रोनने घिरट्या घेतल्याची एक महिन्यातील नाशिकमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २५ ऑगस्टला रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटर परिसरात ड्रोन उडलण्यात आला होता. यातील आरोपींचा शोध लागेलला नसतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button