पिंपरी / चिंचवड
कार मधील सहप्रवाशाला मारहाण करून चौघांनी लुटले
पिंपरी | प्रतिनिधी
कारमध्ये सहप्रवासी म्हणून घेतलेल्या एका तरुणाला मारहाण करून लुटले. ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी म्हाळुंगे येथे घडली.
आशिष त्रीलोक अगरवाल (वय 28, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी रविवारी (दि. 6) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 30 ते 45 वयोगटातील चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथे फिर्यादी एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये प्रवासी म्हणून बसले. त्यावेळी कार मधील अन्य आरोपी यांनी फिर्यादी यांना हाताने व बॉलपेनने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांचा लॅपटॉप, सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, रोख रक्कम असा एकूण 32 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.