breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील विविध विकास कामांसाठी 81 लाख रुपयास मंजूरी

पिंपरी – शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे 81 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

आकुर्डीतील जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मनपा कार्यक्षेत्रामधील मुक्कमी असते. वारक-यांना एक तातडीची व विशेष बाब म्हणून मोफत वैदयकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांच्या सहभागाने शहराची नविन ओळख निर्माण करण्यासाठी नागरी सुविघा केंद्रामार्फत २ हजार फॉर्म कोपा/पासाचे विदयार्थी यांचे मार्फत ५ हजार व स्वयंसेवकामार्फत ५ हजार या प्रमाणे फॉर्म भरुन घेण्यासाठी प्रत्येक फॉर्मचे कामासाठी १५ रुपये या प्रमाणे संबधिताना मानधन अदा करणेस येणा-या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

मनपाचे विदयुत विभागासाठी १०० व्हॅट एलईडी स्ट्रीट लाईट फिटींग साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे ३५ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रभाग क्र ४३ मध्ये जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन्‍ टाकणे या कामासाठी येणा-या सुमारे २५ लाख २६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र १० तुळजाईवस्ती व विवेकनगर मध्यभागात नविन पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी सुमारे २८ लाख ०३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button