पिंपरी / चिंचवड

तळवडे येथे लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पिंपरी | प्रतिनिधी

ज्योतिबानगर तळवडे येथील शशीकमल लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या कारवाईमध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 5) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

लॉज चालक मालक सागर बापू पवार (वय 38, रा. चिंबळी, ता. खेड), लॉज मॅनेजर दीपक वारली (वय 24, रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर आणि दीपक यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवले तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये रोख रक्कम मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 17 हजार 650 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

एका महिलेची वेश्‍या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. आरोपी सागर पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button