TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

किराणा दुकानात दारू विक्रीचा निर्णय समाजद्रोही व धर्मद्रोही – सनातन संस्था

पुणे | महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट व किराणा दुकाना मध्ये दारूविक्री करता येईल असा निर्णय घेतला आहे. ह्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध सनातन संस्थने केला आहे तसेच या सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याच काम केले आहे अशा कठोर शब्दात संताप व्यक्त केला आहे.

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यासह अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यापराक्रमाने पुनीत झालेली भूमी मदयपींची भूमी म्हणून म्हंटले गेले तर त्याचे पातक सरकारला जाईल व हे महापाप ह्या सरकारच्या माथी लागेल अशा शब्दात सनातन संस्थेने तीव्र निषेध केला आहे.

पंजाबमधील युवा पिढी पूर्णपने व्यसनाधीन झालेली आहे त्यावर ‘उडता पंजाब’ सारखा चित्रपट आला, महाराष्ट्र सरकार मद्यपींसाठी सहजरित्या दारू उपलब्धकरून देत आहेत व तरुणांना व्यसनेच्या दारात ढकलून देशोधडीला लावत आहेत असा घणाघात सनातन संस्थेने केला आहे.

ह्या निर्णयामुळे अत्याचार वाढीस प्रोत्साहन मिळत असून अत्याचाराचं पाप ह्या सरकारच्या माथी लागेल. अथर्ववेद, महाभारत, मनुस्मृती तसेच अनेक धर्म ग्रंथात मध्यपान हे महापाप आहे व त्याला प्रोत्साहन देणे हे देखील महापापच आहे असं कडाडून सनातन संस्थेने सांगितले आहे.

त्यामुळे हा समाजद्रोही, धर्मविरोधी निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा असा इशारा सनातन संस्थेने सरकारला दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button