पिंपरी / चिंचवड

भाजी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग ; तिच्या भावी पतीलाही मारहाण

पिंपरी | प्रतिनिधी

भाजी आणण्यासाठी गेलेल्या तरूणीचा विनयभंग केला. तसेच तिच्या भावी पतीलाही मारहाण केली. ही घटना ओटास्कीम निगडी येथे शनिवारी (दि. 5) रात्री घडली.

अक्षय सुभाष वाघमारे (वय 25 रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने रविवारी (दि. 6) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी शनिवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास आपल्या भावी पतीसोबत भाजी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे असलेल्या आरोपी अक्षय याने फिर्यादी यांचा हात पकडून विनयभंग केला. यास फिर्यादी यांच्या भावी पतीने विरोध केला असता आरोपीने त्यांच्या गालावर थप्पड मारून शिवीगाळ केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button