आरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

देशात मागील 154 दिवसांतील निच्चांकी रुग्णवाढ

पिंपरी चिंचवड | भारतातील कोरोना बाबत दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत 25 हजार 166 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 154 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. तसेच, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील 146 दिवसांतील निच्चांकी नोंदवली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 22 लाख 50 हजार 679 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 14 लाख 48 हजार 754 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 36 हजार 830 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्याच्या घडीला देशात 3 लाख 69 हजार 846 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 32 हजार 079 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 437 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.51 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 49 कोटी 66 लाख 29 हजार 524 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 63 हजार 985 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

दुसरीकडे लसीकरणात देखील देशाने मोठा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात आजवरचे उच्चांकी लसीकरण करण्यात आले आहे. चोवीस तासांत 89.13 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 55.47 कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button