पिंपरी / चिंचवड

विश्वासाने दिलेल्या ट्रकचा अपहार

पिंपरी l प्रतिनिधी

दहाचाकी ट्रक विश्वासाने चालवण्यासाठी दिला असता मध्य प्रदेश मधील एका व्यक्तीने ट्रक स्वताच्या फायद्यासाठी चालवून तो ट्रक मालकाला परत न करता त्याचा अपहार केला. हा प्रकार एक मार्च 2022 रोजी सायंकाळी महाळुंगे येथे घडला.

कोमल उर्फ उत्तमसिंह गुलाबसिंह (वय 33, रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भारत रामचंद्र सपकाळ (वय 42, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा दहाचाकी ट्रक आरोपीला विश्वासाने चालवण्यासाठी दिला. त्यावेळी ‘तुमचा ट्रक व्यवस्थित चालविन. ट्रकचा व्यवस्थित सांभाळ करीन’ असा विश्वास आरोपीने व्यक्त केला होता. एक मार्च रोजी आरोपी फिर्यादी यांचा ट्रक हेमनील कंपनी महाळुंगे येथून घेऊन गेला. त्यानंतर त्याने तो ट्रक स्वताच्या फायद्यासाठी चालवला व ट्रकचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button