breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी कडक धोरण अवलंबावे – सचिन साठे

पिंपरी | प्रतिनिधी 
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी स्थापन करण्यात आले. यानंतर शहरातील गुन्हेगारीवर पोलीसांचे कडक नियंत्रण राहणे ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. ती फोल ठरत आहे. अश्या अनेक घटना मागील आठ दहा महिन्यात घडल्या आहेत. मागील दहा दिवसात गोळीबाराच्या दोन घटनेत दोन युवकांचा खून झाला आहे.

अशा खुनांच्या व महिला अत्याचारांच्या घटनेत लक्षणिय वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था चिंताजनक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगार व गुन्हेगारी क्षेत्रावर वचक बसविण्यासाठी तातडीने कडक धोरण अवलंबवावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी केली.

साठे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या युवकांकडून वाहनांच्या तोडफोडीच्या 50 हून जास्त घटना मागील आठ महिन्यात घडल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन व नविन गुन्हेगारांचा समावेश आहे. अनेक अल्पवयीन आणि तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षण म्हणून ओढले जात आहेत. शहरातील संघटीत गुन्हेगारी व माथाडी क्षेत्रातील दहशत यामुळे सर्व सामान्य नागरीकांसह उद्योजक, व्यापारी दहशतीच्या छायेत आहेत. हे गुन्हेगारी क्षेत्रावर व कायदा सुव्यस्थेवर पोलिसांचे नियंत्रण कमी झाल्याचे लक्षण आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सार्वत्रिक निवडणूका होणे अपेक्षित आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती गुन्हेगारी हि चिंताजनक बाब आहे. गुन्हेगारीवर पुर्ण नियंत्रण मिळविणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कर्तव्य आहे. येथील महिला, युवतींना, उद्योजक, व्यापा-यांना, सर्वसामान्य नागरीकांना भयमुक्त वातावरण मिळाले पाहिजे हा या शहरातील नागरीकांचा हक्क आहे. आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख या नात्याने गुन्हेगार व गुन्हेगारी क्षेत्रावर वचक बसविण्यासाठी आपण तातडीने कडक धोरण अवलंबावे असेही या पत्रात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button