पिंपरी / चिंचवड

रहाटणी येथील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पिंपरी l प्रतिनिधी

रहाटणी येथील अजिंक्य तारा नावाच्या स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी गुरुवारी (दि. 24) सायंकाळी कारवाई केली. यामध्ये एकास अटक करण्यात आली आहे.

तानाजी मारुती जाधव (वय 26, रा. रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील एचपी पेट्रोल पंपाशेजारी अजिंक्य तारा नावाच्या स्पा सेंटरमध्ये आरोपीने बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय केला. त्यासाठी त्याने एका महिलेला पैशांचे आमिष दाखवूंत इच्याकडून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून आलेल्या पैशांवर आरोपीने आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button