breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत विलास लांडे आणि महेश लांडगे यांच्यात लढत, सहाजणांनी घेतली माघार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांना तोडीस तोड मानले जाणारे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार दत्ता साने यांच्यासह सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यात आता लढत होणार आहे.

माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, डॉ. मिलिंदराजे भोसले, विष्णू शेळके, महेश तांदळे यांनी आपले अर्ज काढून घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. सुरूवातीला महेश लांडगे यांना तोडीस तोड असणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी जोरदार आव्हान उभे केले होते.  

महेश लांडगे यांना कोणत्याही परिस्थितीत पाडणारच असा पणच त्यांनी केला होता. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. तर, माजी आमदार विलास लांडे यांनी सुध्दा राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे दोघांपैकी कोण माघार घेणार हा खरा प्रश्न होता.

शेवटी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मध्यस्थिने दत्ता साने यांनी आपला अर्ज काढून घेत माजी आमदार विलास लांडे यांच्यापुढील निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा केला. आता लांडे आणि महेश लांडगे यांच्यात लढत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button