breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

TCS दराबाबत केंद्र सरकारची नवी घोषणा! वाढीव दर लागू करण्याची मुदत वाढवली

TCS : केंद्र सरकारने TCS (Tax Collection At Source) बाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. आता TCS चा नवा नियम १ जुलै २०२३ ऐवजी १ ऑक्टोबर २०२३ रोजी लागू होईल. अंमलबजावणीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवल्यामुळे, स्त्रोतावरील कर संकलनाबाबतचा जुना नियम लागू राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरवर्षी ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक फॉरेन रेमिटन्सवर TCS भरावे लागणार नाही.

अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. प्रति व्यक्ती ७ लाख रुपये प्रति व्यक्ती LRS अंतर्गत भरलेल्या परदेशी टूर पॅकेज खर्चावर कोणतेही TCS देय होणार नाही. मात्र, या रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यावर वाढीव टीसीएस भरावा लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना फॉरेन रेमिंटे्सवर टीसीएस दर वाढवण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा – ‘संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा’; छगन भुजबळ यांची मागणी

सध्या LRS अंतर्गत फॉरेन रेमिंटेसवर फक्त ५ टक्के टीसीएस आकारला जातो. आता, यामध्ये वाढ करण्यात आली असून २० टक्के इतका करण्यात आला आहे. काही बाबतीत सवलत देण्यात आली आहे. वाढीव दर हे १ जुलै २०२३ पासून लागू होणार होते. सध्या याला ३ महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहे. एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button