breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोरोनाविरुद्ध कराड तालुका सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याप्रमाणे शौर्याने लढेल : सरपंच जयवंत मोहिते-पाटील

कराड । महाईन्यूज । प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती  आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अत्यंत विश्वासू योद्धा म्हणून ओळखले जाणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रमाणेच कोरोनाविरुद्धच्या लढाईत कराड तालुका लढेल, असा विश्वास तळबीडचे लोकनियुक्त संरपंच जयवंत मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.

तळबीड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. त्यांच्या 390 वी जयंतीनिमित्त (१ मे) स्थानिक नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत घरातच सरसेनापती मोहिते यांना अभिवादन केले.

तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते म्हणाले की, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’मालिकेतून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या शौर्यागाथेला उजाळा मिळाला. त्यामुळे राज्य-परराज्यातून इतिहासप्रेमी या ठिकाणी समाधीस्थळाला भेट देतात.  गावात मनमोहक राममंदिर उभारण्यात आले आहे. गावचे ग्रामदैवत चंद्रश्वरची यात्रा चैत्र महिन्यात भरवली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला. कोरोनासारखा महाभयंकर रोग गावच्या वेशीबाहेर ठेवण्यासाठी गावातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. आमचा कराड तालुका सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्याप्रमाणे शौर्याने लढेल आणि कोरोनाला हद्दपार करेल, असा विश्वासही जयवंत मोहिते यांनी व्यक्त केला.

तळबीड गावची पार्श्वभूमी….

वसंतगड म्हणजे चंद्रगडच्या पायथ्याशी तळबीड हे गाव आहे. शिवकालापासून सैन्याचा वारसा या गावाला लाभला आहे. कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई यांचे वडील आणि शिवरायांचे मेहूणे आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे मामा म्हणजे हंबीरराव मोहिते. नात्यांच्या भावनिक बेड्यांमध्ये न अडकता स्वराज्यप्रति निष्ठा आणि कर्तव्य जपणारे शूरवीर हंबीराव मोहिते यांची समाधी तळबीड या गावात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button