TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रियलेख

तळेगाव दाभाडे ः अवैध गुटखा विक्रीवर खंडणी विरोधी पथकाची कारवाई; साडे सात लाखांच्या मुद्देमालासह २ जणांना अटक

पिंपरी: तळेगाव दाभा डे परिसरात अवैध गुटखा विक्रीचा डाव गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला आहे. २ लाख ९५ हजार रूपयांच्या किंमतीच्या गुटख्यासह सुमारे साडे सात लाख रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी सापळा रचून जप्त केला आहे. या कारवाईत पोलीसांनी २ आरोपींना अटक देखील केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे हे स्टाफसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहीती काढण्याकरीता, तळेगाव दाभाडे भागात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना खबर मिळाली की, राखाडी रंगाची इको गाडी नंबर MH- 14 / EY/3668 ही गाडी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे रात्री उशीरा येणार असुन, त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा सदृश्य पदार्थाचा साठा विक्री करीता आणणार आहे.

ही खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक उध्दव खाडे यांनी सोबत असलेल्या स्टाफला ब्रीफ करुन, कडोलकर कॉलनी येथील लायन्स क्लब जवळ सापळा लावला. दिनांक २५/०३/२०२३ रोजी रात्री दिडच्या सुमारास इको कार नं. MH-14 / EY / 3668 मधुन निहार गोपाल विश्वास (वय ५१ वर्षे रा. म्हस्करनेस कॉलनी, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे) असे सांगून त्याच्या सोबत असलेला इसम हा त्याचा कामगार असुन त्याचे नाव अविजीत रणजीत बाच्छार (वय २६ वर्षे) यांना शिताफिने ताब्यात घेतले.

पोलीसांनी इको कारची पाहणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक, अपायकारक असा गुटखा मिळुन आला. इको कार, ०२ मोबाईल व २ लाख ९४ हजार ५५४ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण ७ लाख ५४ हजार ५५४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरूध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button