breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करा: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

यंदाचा गुढीपाडवा ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा… कुणीही घराबाहेर पडू नये… रस्त्यावर येऊ नये आणि गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन… शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नागरिकांनी यंदा ‘कोरोना’विरोधात लढण्याची… जनजागृती करण्याची… ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button