breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

कायदा हातात घेणं चांगलं नाही,उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार संतापले

Ulhasnagar Crime : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून उल्हासनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे अटकेनंतर वैद्यकीय चाचणीसाठी नेताना आरोपी गायकवाड हसत पोलिस स्टेशनबाहेर आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा – भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर अंदाधुंद गोळीबार, कारण काय?

अजित पवार म्हणाले, उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या.  रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात कुणाच्याबद्दल माझी काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे.

गणपत गायकवाड यांनी वेळोवेळी त्यांचा आमदार निधी हा वापरला जात नाही जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे असे आरोप प्रत्यारोप अनेक वेळा त्यांनी केले आहेत. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड नाराज होते. तीन दिवसांपासून गणपत गायकवाड  यांचा कल्याणमध्ये कधी उद्घाटनावरून तर कधी जमिनीवरून वाद सुरू आहे आणि या वादाचा अखेरअंत काल उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button