breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर अंदाधुंद गोळीबार, कारण काय?

मुंबई | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

हेही वाचा   –    ‘राज्यात ज्यूदो खेळाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिली. आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात वादावादी झाली. यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

काल संध्याकाळी जवळपास ४०० ते ५०० जण घेऊन महेश गायकवाड पोलिस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील. तर माझा जगून तरी काय फायदा ? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होत नाही, अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button