पिंपरी / चिंचवड

तडीपार आरोपीने पैशांसाठी केले अपहरण : अपहृत व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी केली दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

एका तडीपार आरोपीने त्याच्या साथीदारासोबत मिळून एका व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण केले. अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेऊन एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली.

राहुल संजय पवार (वय 31, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड), नितीन पोपट तांबे (वय 32, रा. तांबेवस्ती, माणिकनगर, निमगाव दावडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी रोहताशकुमार चौधरी (रा. राजे शिवाजीनगर सेक्टर 16 चिखली) या व्यक्तीचे अपहरण केले होते.

आरोपींनी पैशांच्या कारणावरून रोहताशकुमार यांचे पैशांच्या कारणावरून हाताने मारहाण करून दमदाटी करून गाडीत बसवून अपहरण केले. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एक पथक स्थापन केले. तपास करताना पोलीस अंमलदार संजय जरे यांना माहिती मिळाली कि, रोहताशकुमार यांचे अपहरण करणारे व्यक्ती कीरकीटवाडी येथे आहेत. अपहृत रोहताशकुमार देखील त्याच परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दोघांना अटक करत अपह्रत व्यक्तीची सुटका केली.

आरोपींनी उसन्या पैशांच्या कारणावरून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी राहुल पवार याच्यावर पुणे, पिंपरी चिंचवड शहरात खून, खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button