पिंपरी l प्रतिनिधी
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
करण कुमार जाधव (वय 25, रा. मोशी टोलनाक्याजवळ, मोशी), दत्ता बबन खंडागळे (वय 21, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) अशी तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन्ही आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, जबरी चोरी, जबर दुखापत, दंगा, मारामारी, दरोडा तयारी घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी याबाबत उपायुक्त कार्यालयाकडे अहवाल सादर केल्यानंतर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी तडीपारीचे आदेश दिले.