breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी रुग्णालय खासगीकरणास विविध संघटनाचा विरोध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेने भोसरी येथील नव्याने बांधलेले हॉस्पिटल खासगी संस्थेस देण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव मंजुरीस महासभेपुढे ठेवला होता. या निर्णयाविरोधात नागरी हक्क सुरक्षा समिती व इतर समविचारी पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरीत आंदोलन करण्यात आले.

रुग्णालय खासगीकरणास विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या या लोकविरोधी निर्णयाला विरोध करण्यासाठी नागरी हक्क सुरक्षा समिती व इतर समविचारी पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी सकाळी ११ ते दुपारी एकपर्यंत आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्ष, स्वराज अभियान व इतर सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, प्रदीप पवार, गिरीश वाघमारे, नीरजकुमार कडू, शेतकरी कामगार पक्ष पिंपरी चिंचवडचे हरीश मोरे, नितीन बनसोडे, छायावती देसले, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, वैजनाथ शिरसाट, रयत विद्यार्थी विचार मंचाचे धम्मराज साळवे, संतोष शिंदे, वंदना गायकवाड, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, बारा बलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, अपर्णा दराडे, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button