breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील कोविड केअर सेंटरमध्ये प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सुरू करा : आमदार महेश लांडगे

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे आग्रही मागणी

प्रभागनिहाय सीसीसी सेंटरमध्ये प्लाझ्मा डोनेट विंडो सुरू होणार


पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सुरू करावा, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘प्लाझ्मा थेरपी’कोविड -१९ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी (डोनेशन) मोहीम सुरू केली आहे. प्लाझ्मा देणगीदारांच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. त्यामुळे शहरात प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभागनिहाय नियोजित कोविड केअर सेंटरमध्ये आपण स्वतंत्र ‘विंडो’ सुरू करावी. तसेच, प्लाझ्मा डोनेशनसाठी रुग्णांमध्ये जनजागृती करावी, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
सध्या शहरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७ हजाराहून अधिक आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे साडेतीन हजार इतकी आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा वापर केल्यास गंभीर कोविड रग्ण असलेल्या नागरिकांचे प्राण वाचवता येतील, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. आता महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यावर सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्लाझ्मा थेरपी…
तर एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करते. या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकते.

प्लाझ्मादान करणाऱ्या व्यक्तीसाठी 4 अटी आहेत…

• डोनर म्हणजे दाता रुग्णाने कोव्हिड-19 शी यशस्वी लढा दिलेला पाहिजे.

• दाता पूर्णपणे बरा झाल्याच्या 14 दिवसांनंतरच त्याचं रक्त घेता येते. त्याचे कोरोनाचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्लाझ्मा घेतलं जाऊ शकते.

• प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीने गेल्या तीन महिन्यात परदेश प्रवास केलेला असू नये.

• त्या व्यक्तीला ताप किंवा श्वसनाशी संबंधित विकार असू नयेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button