breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

H3N2 Virus च्या प्रादुर्भावावर यंत्रणा अलर्ट मोडवर; आरोग्यमंत्र्यांचे जनतेला महत्वाचं आवाहन

इन्फ्लूएंझाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दिल्या सूचना

मुंबई : देशात H3N2 या इन्फ्लूएंझा विषाणुचे रूग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातही या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, मास्क चा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

देशभरात इन्फुएंझाचे रूग्ण वाढत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही रूग्ण वाढत आहेत. या व्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. मात्र काळजीचं काही कारण नाही. मी लोकांना हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. जर लोकांना गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांनी मास्क आवर्जुन लावावा. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचही पालन करावं, असं तानाजी सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्मचा-यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमून उपचाराचे काम सुरु ठेवावे.

कोविड 19 किंवा इन्फ्लूएंझा बाबतीत नियमित रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात, रुग्णाच्या सहवासात आल्यापासून 10 दिवसांत फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

सर्दी खोकला अंगावर काढू नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लूवरील औषध सुरु करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी. खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हात रुमाल वापरावा. आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचनांचा समावेश आहे.

इन्फ्लूएंझा : इन्फ्लूएंझाचे टाईप A, B आणि C, असे प्रकार आहेत. इन्फ्लूएंझा टाईप ‘A’ चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3N2 असे आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button