breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लवकरच 10वी, 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संकटाचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे जुलै महिन्याला सुरवात झआली असली तरीही अद्याप महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी (SSC) आणि एचएससी (HSC) विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालांच्या तारिख काय असेन ते समजलेलं नाही आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जुलै 2020 पर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 12वीचा निकाल यंदा 15 जुलै पर्यंत तर 10 वीचा निकाल यंदा जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत जाहीर केला जाणार आहे. दरवर्षी निकालाच्या अवघ्या 1-2 दिवस आधीच मंडळाची निकालाची तारीख जाहीर केली जाते. सकाळी 11 वाजता बोर्डाकडून अधिकृत निकालाची माहिती दिली जाते तर दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सोबतच बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पाहता येतो.

दरम्यान यंदा कोरोना संकट पाहता देशामध्ये सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या 12वी, 10वीच्या परीक्षा देखील रद्द झाल्या आहे. त्यांना सरासरी गुण देऊन अंतर्गत मुल्यमापनानुसार मार्क्स देऊन निकाल लावले जाणार आहे. महाराष्ट्रात बोर्डाचे 12वीचे पेपर सुरळीत झाले आहेत. मात्र 10वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने त्याचे सरासरी गुण देऊन निकाल लावले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button