breaking-newsआंतरराष्टीय

चीनचे दुसरे अंतराळ स्थानक लवकरच पृथ्वीवर कोसळणार

बीजिंग (चीन)– चीनचे दुसरे अंतराळ स्थानक लवकरच पृथ्वीवर कोसळणार आहे, अशी माहिती चिनी अंतराळ संस्थेने दिली आहे. अंतराळ स्थानकावरचे नियंत्रण सुटल्यामुळे ते आपल्या कक्षेबाहेर गेले आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हे अंतराळ स्थानक दक्षिण पॅसेफिक महासागरात कोसळेल, मात्र कोसळण्यापूर्वी त्याचा मोठा हिस्सा जळून गेलेला असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सन 2016 मध्ये तियागॉंग-2 हे अंतराळ स्थानक अंतराळात पाठवण्यात आले होते. तेव्हा त्याच्याबरोबर दोन अंतराळवीर पाठवण्यात आले होते. ते एक महिना तियागॉंग-2 वर राहिले होते. तियागॉंग-2 या अंतराळ स्थानकाने आपली दोन वर्षाची कामगिरी बजावलेली आहे. पुढील वर्षी पृथ्वीवर कोसळणाऱ्या तियागॉंग-2 ची लांबी 34 फूट आणि रुंदी 14 फूट असून त्याचे वजन 8600 किलोग्रॅम आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button