पिंपरी / चिंचवड

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

पिंपरी l प्रतिनिधी

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका प्रियकराने सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार 13 डिसेंबर 2021 रोजी रात्री भूमकर वस्ती, हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी 4 एप्रिल 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास लक्ष्मण ओल्लावार (वय 35) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुहास यांचे वडील लक्ष्मण सांबाजी ओल्लावार (वय 64, रा. चंद्रपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 32 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी महिलेचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातून महिलेने फिर्यादी यांच्या मुलाला त्रास दिला. मुलगा सुहास याला आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय महिलेने ठेवला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सुहास याने आरोपी महिलेच्या नावाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरी पंख्याला बेडशीटने गळफास लाऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button