breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

31 जुलैपर्यंत पिंपरी-चिंचवडकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक

पिंपरी |महाईन्यूज|

पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. तर पिंपरी आणि थेरगाव परिसरात घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्य सेवेची दुकानं 8 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी असणार आहेत.

तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button