breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ!

स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचा वेतनवाढ करार

आमदार महेश लांडगे यांची कंपनी-संघटनेत यशस्वी मध्यस्थी

पिंपरी । प्रतिनिधी

पुणे आणि नाशिक येथील औद्योगिक वसाहतीतील ट्रॅक कंपोनन्ट्स लि. कंपनीच्या कामगारांना तब्बल १२ हजार ५०० रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये वेतनवाढ करार झाला. त्यामुळे कामगारांनी फटाके आणि गुलालाची उधळण करीत आंनदोत्सव साजरा केला.

आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात वेतनवाढ करार झाला. संघटनेचे प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, जी.आर.आय. टॉवर इंडिया प्रा. लि. कोल्हापूर कंपनीचे डायरेक्ट रमेश म्हस्करंस, ट्रॅक कंपोनंन्ट्सचे सी.ई.ओ. राजेश खन्ना यांनी वेतनवाढ करारावर स्वाक्षरी केल्या.

हेही वाचा – रूपाली चाकणकर पुण्यातील ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार

यावेळी संघटनेचे सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शाम सुळके, सहचिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसन बावकर, तेजश बीरदवडे, महिंद्रा लॉजीस्टिक युनिट अध्यक्ष प्रशांत पाडेकर, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, यूनिट अध्यक्ष चेतन सूर्यवंशी, उपाध्यक्ष रुपेश ढाके, सरचिटणीस समीर शेख, सहचिटणीस शशिकांत माळी, खजिनदार राकेश गिराशे, चाकण यूनिट अध्यक्ष दिपक बऱ्हाटे, उपाध्यक्ष मिंन्टू कुमार, सरचिटणीस प्रवीण वाडेकर, सहचिटणीस अनिल कुंभार, खजिनदार सवाई सिंह, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे सी.इ.ओ. राजेश खन्ना, प्लांट हेड. महेंद्र पाटील, चाकण प्लांट हेड गिरीश भेंडगावे, एच आर मॅनेजर अविनाश चोरमाले, पर्चेस मॅनेजर स्वप्निल मौले आदी उपस्थित होते.

पुजाताई थिगळे यांनी सूत्रसंचालन केले, व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.

वेतनवाढ करारातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे :

कामगारांना एकूण १२ हजार रुपये प्रत्यक्ष पगार वाढ झाली. मेडिक्लेम पॉलीसी १ लाख रुपये संपूर्ण खर्च कंपनी करणार व जादाची ३०००००/- रुपयांची बफर पॉलीसी, मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, एखाद्या कामगाराचा किंवा त्याच्या कुटुंबीयाला मोठ्या आजारामुळे जास्त खर्च आल्यास तर कंपनीने सर्वच्या सर्व खर्च म्हणजेच १००% रक्कम देण्याचे मान्य केले आहे. सुट्ठी – A) PL – १५, B) SL – ०८, C) CL – ०८, D) PH – १० तसेच मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील. मासिक हजेरी बक्षीस, कॅन्टीन सुविधा, दिवाळी बोनस १२ हजार ६०० रुपये. वैयक्तिक कर्ज सुविधा, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १५ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button