पिंपरी / चिंचवड

अडीच लाख रुपये हुंडा घेतल्या प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

विवाहितेच्या माहेरच्या लोकांकडून अडीच लाख रुपये हुंडा घेतला. लग्न झाल्यानंतर विवाहितेचा छळ केला. तिचे दागिने संमतीशिवाय सासरच्यांनी काढून घेतले. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 जून 2017 ते 7 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सातारा, जळगाव येथे घडला.

पती जयेश अरुण पाटील, सासरे अरुण पोलाद पाटील, दीर योगेश अरुण पाटील, सासू आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. विवाहितेचे दागिने पतीने तिच्या संमतीशिवाय काढून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या वडिलांकडून हुंडा म्हणून सासरच्यांनी अडीच लाख रुपये रोख रक्कम घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विवाहितेने माहेरी आल्यानंतर याबाबत फिर्यादी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button