breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

रशियाची कोंडी करण्यास अमेरिकेचे कठोर निर्बंध

 

वॉशिंग्टन | टीम ऑनलाइन
रशिया-युक्रेन सीमेवर युद्धजन्य परिस्थिती असतानाच आता अमेरिका आणि रशिया या दोन देशांमधील संबंध आणखी ताणल्याचे दिसत आहे. कारण आता अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंधाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता रशियाची मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर अमेरिका युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याची घोषणाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. त्यात ब्रिटन, फ्रान्स, इटली या युरोपीय देशांनी रशियाविरुद्ध निर्बंध जाहीर केल्यानंतर आता अमेरिकेनेही पहिले कठोर पाऊल उचलले आहे. बायडन यांनी देशवासीयांना संबोधित करताना रशियावर आर्थिक निर्बंध लादले जात असल्याचे घोषित केले. दोन रशियन वित्तीय संस्थांवर निर्बंध लावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पाश्चिमात्य देशांकडून रशियाला जे सहाय्य मिळत आहे ते आता मिळणार नाही. व्यापार व अन्य बाबतीतही नाते तोडले जाईल, असा इशाराच बायडन यांनी यावेळी दिला. रशिया सातत्याने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. रशियाने युक्रेनला चारही बाजूंनी घेरले आहे. या दोन देशांमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. बदलत्या स्थितीनुसार आम्ही पावले टाकत आहोत. आमच्याकडे विविध पर्याय खुले असले तरी सध्या आम्ही ‘डिफेन्सिव्ह मोड’मध्ये राहण्याचे ठरवले आहे, असे बायडन यांनी नमूद केले. तसेच अमेरिका युक्रेन आणि रशियामधील घडामोडींवर लक्ष ठेवून असून परिस्थितीचे आकलन करत आहे. अमेरिकेकडून युद्ध टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर आपण युक्रेनला लष्करी मदत करणार असून याबाबत संरक्षणात्मक उपाययोजना करणार असल्याचेही बायडन यांनी म्हटले. मात्र या दोन्ही राष्ट्रांमधील कटुता वाढल्याने जगभराची चिंता वाढवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button