breaking-newsताज्या घडामोडीराजकारणलेख

उत्तर प्रदेशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान

 

लखनऊ | प्रतिनिधी 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. चौथ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. यात रोहिलखंड ते तराई बेल्ट आणि अवध प्रदेशापर्यंत 624 उमेदवार रिंगणात आहेत. या चौथ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे 7022 निरीक्षक, उपनिरीक्षक, 58132 कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल चौथ्या टप्प्यात तैनात करण्यात आले आहेत. तसेच मतदान शांततेत पार पाडण्यासाठी 21 कंपनी पीएसी, 50 हजार 490 होमगार्ड, 1850 पीआरडी जवान, 8486 चौकीदार यांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे.

पहिल्या तीन टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांपैकी 172 जागांसाठी मतदान झाले, तर आता चौथ्या टप्प्यातील 59 विधानसभा जागा रायबरेली, पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, लखनऊ, उन्नाव, फतेहपूर आणि बांदा जिल्ह्यातील आहेत. या टप्प्यात लखनऊसह रायबरेलीवर विशेष लक्ष असेल, कारण हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या इथूनच लोकसभेच्या खासदार आहेत.

दरम्यान, चौथ्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये 137 पिंक बूथ (महिला बूथ) तयार करण्यात आले आहेत. पिंक बूथवर 36 महिला निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 277 महिला कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबल तैनात करण्यात आल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button